नवी मुंबई - अनेक महिन्यांपासून डोळ्यांत पाणी आणणाऱ्या आणि शंभरी गाठलेल्या कांद्याचे भाव घाऊक बाजारात ५० ते ५५ रुपयांवर घसरले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक गेल्या १५ दिवसांपेक्षा अधिक झाली आहे. मात्र, ग्राहकांच्या माध्यमातून जास्त कांदा खरेदी होत नसल्याने ही दर घसरण सुरू झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
१५ दिवस अगोदर जुना कांदा १०० रुपये किलोने विकला गेला जात होता. त्यामुळे कांदा हा सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेला होता. आता नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांदा आणि जुना कांदा मिळून आज (शुक्रवारी) ११० गाड्या आल्या आहेत. यामुळे नवीन कांदा आल्याने १५ दिवस अगोदर जो जुना कांदा १०० रुपये किलोने विकला गेला सद्यस्थितीत तोच जुना कांदा हा ५०, ६० आणि ७० रुपये किलोने घाऊक बाजारात विकला जात आहे. याबरोबरच येत्या काही काळात कांद्याची आवक अधिक वाढली तर आणखी कांद्याचे दर खाली येतील, असे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे. यामधील काही प्रमाणातील कांदा गुजरात तसेच राज्यातील अहमदनगर, नाशिक आणि पुणे येथून आला आहे.