महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane 1 Rs Litter Petrol : प्रताप सरनाईकांच्या वाढदिवसानिमित्त ठाणेकरांना एका रुपये प्रतिलीटर पेट्रोल, नागरिकांची गर्दी - प्रताप सरनाईक वाढदिवस

आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Saranaik ) यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ईडीच्या त्रासातून काही दिवस त्रासलेले प्रताप सरनाईक यांनी ( 1 Rs Litter Petrol In Thane ) केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीचा ( Petrol Disel Price Hike ) निषेध करत चक्क एक रुपयामध्ये पेट्रोल उपलब्ध करून दिला आहे.

MLA Pratap Saranaik Birthday
MLA Pratap Saranaik Birthday

By

Published : Apr 25, 2022, 5:22 PM IST

Updated : Apr 25, 2022, 9:46 PM IST

ठाणे -शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Saranaik ) यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ईडीच्या त्रासातून काही दिवस त्रासलेले प्रताप सरनाईक यांनी ( 1 Rs Litter Petrol In Thane ) केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीचा ( Petrol Disel Price Hike ) निषेध करत चक्क एक रुपयामध्ये पेट्रोल उपलब्ध करून दिला आहे.

प्रतिक्रिया

एक रुपये प्रतीलीटर दराने पेट्रोल -ठाण्याच्या विद्यापीठ परिसरामधील पेट्रोल पंपावर ही सेवा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सुरू करण्यात आली आहे. आज दिवसभर अशा पद्धतीने हजारो नागरिकांनी त्यांच्या या सेवेचा लाभ घेतला. एकिकडे वाढलेले पेट्रोलचे दर सर्व सामान्य जनतेला न परवडणारे आहेत. अशातच 120 रु. प्रति लीटरने मिळणारे पेट्रोल जर तुम्हाला १ रु. लीटरने मिळत आहे. ठाण्यातील कापूरबावडी येथील मुक्त विद्यापीठ शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर एक रु. लिटर दराने पेट्रोल भरला जात आहे. त्यामुळे एक रुपयात पेट्रोल भरण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरची लांबच लांब रांग पेट्रोल पंपाच्या बाहेर लागलेली पाहायला मिळत आहे.

ठाणेकरांना दिलासा -दरम्यान, सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग्ज किंवा बॅनर न लावता सर्वसामान्य ठाणेकरांना एक दिवस पेट्रोल दरात दिलासा मिळावा, या उद्देशाने शिवसेना नगरसेविका आशा डोंगरे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबवला असल्याचं आयोजकांनी सांगितले.

हेही वाचा -Navneet Rana Wrote Letter To LS Speaker : 'मी अनुसूचित जातीची असल्याने मला पाणी दिले नाही', नवनीत राणांचे गंभीर आरोप

Last Updated : Apr 25, 2022, 9:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details