ठाणे- खाजगी कामासाठी भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना डंपरची धडक लागून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भिवंडी तालुक्यातील वसई-भिवंडी मार्गावरील खार्डी पुलावर घडली. अनिल सुरेश तांगडी (वय २२) असे मृत दुचाकीस्वराचे नाव आहे.
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; भिवंडी तालुक्यातील घटना - दुचाकीस्वार
खाजगी कामासाठी भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना डंपरची धडक लागून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भिवंडी तालुक्यातील वसई-भिवंडी मार्गावरील खार्डी पुलावर घडली. अनिल सुरेश तांगडी (वय २२) असे मृत दुचाकीस्वराचे नाव आहे.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
मृत अनिल हा काही कामासाठी खरबांव येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास जात होता. दरम्यान, वसई -भिवंडी मार्गावरील खार्डी पुलाजवळ एका डंपरने माती भरावासाठी वळण घेतले. त्याच दरम्यान भरधाव दुचाकी डंपरवर जाऊन आदळली. त्यामुळे अपघात घडला.
या अपघातात अनिलच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Last Updated : Jun 28, 2019, 1:26 PM IST