महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याणामध्ये कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, डोंबिवलीत आढळला आणखी एक रुग्ण - कोरोना

कल्याण पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा उपचारादरम्यान जगजीवन राम रेल्वे रुग्णालयात मृत्‍यू झाला आहे. तर डोंबिवलीत एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. यामुळे रुग्णांची संख्या 35 च्या घरात गेली आहे.

महापालिका
महापालिका

By

Published : Apr 7, 2020, 4:59 PM IST

ठाणे- कल्याण पश्चिम परिसरात राहणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्‍यू झाला आहे. मृत महिला 3 एप्रिल रोजी कल्‍याण येथील जगजीवन राम रेल्वे रुग्णालयात दाखल झाली होती. त्याच दिवशी त्या महिलेला दुपारच्या सुमारास भायखळा रेल्‍वे रुग्णायलात दाखल करण्यात आले होते. येथून या महिलेला जगजीवन राम रेल्‍वे रुग्णालयात हलविण्‍यात आले होते. सोमवारी (दि. 6 एप्रिल) रोजी सायंकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्‍यू झाल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दील आज एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्‍ण यापूर्वी उपचार घेत असलेल्‍या कोरोनाबाधित रुग्‍णाचा निकटवर्तीय आहे. यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या 35 झाली आहे. तर कल्याण पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्त आढळून आलेल्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत 14 दिवस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत महापालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा, महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

सात रुग्णांना डिस्चार्ज

डोंबिवली पूर्वेतील एका रुग्णाला पूर्ण तपासणीनंतर डिस्चार्ज मिळाला आहे. या रुग्णासह डिस्चार्ज मिळालेल्‍या एकूण रुग्‍णांची संख्‍या सात झाली आहे. यामध्ये 4 रुग्‍ण कल्‍याण तर 3 डोंबिवलीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -'कोरोनाची नाही भीती, पाण्यासाठी रोजचीच भटकंती'; निभाळपाड्यातील महिलांची व्यथा

ABOUT THE AUTHOR

...view details