ठाणे - कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू असताना आज सायंकाळी अचानक मुरबाड तालुक्यातील टोकावडे, म्हसा, धसई, कळंभे, शिवळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर टोकावडे येथे एका मजुराच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाला. मधुकर दाजी चव्हाण (रा. नागवाडी टोकावडे) असे त्याचे नाव आहे.
ठाण्यात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने एक ठार - ठाणे अवकाळी पाऊस न्यूज
जिल्हाबंदी असल्याने मुरबाड तालुक्याला जोडणारा पुणे, रायगड, पालघरची सीमा बंद करण्यात आली आहे. मात्र, आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने नागरिकांसह प्रशासनाची तारांबळ उडवली. वातावरणात होणारा बदल व यामुळे होणारे व्हायरल इन्फेक्शन यामुळे सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे
मुरबाड तालुक्यातील सर्व गावात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गावबंदी करण्यात आली आहे. तसेच बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश बंद असल्याने गावागावात स्वतः नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. जिल्हाबंदी असल्याने मुरबाड तालुक्याला जोडणारा पुणे, रायगड, पालघर यांची सीमा बंद करण्यात आली आहे. मात्र, आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने नागरिकांसह प्रशासनाची तारांबळ उडवली. वातावरणात होणारा बदल व यामुळे होणारे व्हायरल इन्फेक्शन यामुळे सावध रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज झालेल्या विजांचा कडकडाट, वादळी वारे व जोरदार पावसाने शेतकरी वर्गाच्या भाजीपाल्याची नासाडी झाल्याची माहिती समोर आली आहे.