ठाणे:शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तीन हल्लेखोर नातेवाईकांवर हत्येचा व जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर तिन्ही हल्लेखोर फरार झाले आहे. मनवीर मरोठीया असे हत्या झालेल्या नातेवाईकाचे नाव आहे. तर रामपाल करोतीया आणि राखी करोतिया असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.
तलवारीने केला हल्ला: मृत मनवीर मरोठीया उल्हासनगर शहरातील फार्व्हर लाईन भागात इमली पाडा परिसरात कुटुंबासह राहत होते. त्यातच गेल्या अनेक दिवसापासून मत मनवीर आणि त्यांच्या मरोठीया कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू होता. याच वादातून अनेकदा जोरदार भांडणही झाले. परंतु आज सकाळच्या सुमारास कामावर जात असताना, तीन हल्लेखोर नातेवाईकांनी फार्व्हर लाईन चौकात मनवीर यांना गाठून त्यांच्यावर तलवार आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. तर मनवीर सोबतच कामावर जाणारे रामपाल करोतीया, राखी करोतिया यांच्यावरही हल्लेखारांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मनवीर यांच्यावर तलवारीने गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर संपत्तीच्या वादात मध्यस्थी करणारे रामपाल आणि राखी करोतीया यांच्यावर हल्ला झाल्याने ते जखमी झाले आहेत.