ठाणे- उल्हासनगरात डेंग्यूने पहिला बळी घेतला आहे. संदेश वीरेंद्र पाल (वय-१८) असे डेंग्यू आजाराने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कॅम्प ३ मधील शांतीनगर, दत्तवाडी परिसरात घडली आहे. डेंग्यूचा हा पहिलाच बळी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त व महापौर शहरात स्वच्छता अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याचे सांगत असले, तरी शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात विविध साथीचे आजार पसरू लागले आहेत.