महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात चारचाकी झाडावर आदळून भीषण अपघात; एक ठार, तिघे जखमी - घोडबंदर रोडवर शनिवारी अपघात

घोडबंदर रोडवर शनिवारी कार झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. आरडीएमसीच्या माहितीनुसार, ही घटना कपूरबावडी परिसरातील विहंग हॉटेलजवळ घडली.

ठाणे घोडबंदर रोड अपघात
ठाणे घोडबंदर रोड अपघात

By

Published : Jun 14, 2020, 7:26 AM IST

ठाणे - घोडबंदर रोडवर शनिवारी चारचाकी झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात चारचाकीचा चक्काचूर झाला.

कापूरबावडी पोलीस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष (आरडीएमसी) आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी अग्निशमन गाडी आणि एका बचाव वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. आरडीएमसीच्या माहितीनुसार, ही घटना कपूरबावडी परिसरातील विहंग हॉटेलजवळ घडली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details