भिवंडीत गोदामाचे शटर तोडून एक कोटी २३ लाखांचे चांदीचे भांडी लंपास - bhiwandi crime news
शुभम इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समधील डी लुसो नावाचे फर्निचर गोदाम आहे. या गोदामात सुमारे १६० किलो वजनाची एक कोटी २३ लाख रुपये किंमतीची चांदीची भांडी साठवून ठेवण्यात आली होती. ही चांदीची भांडी अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर उचकटून लंपास केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे करत आहेत.
ठाणे -फर्निचरच्या एका गोदामात साठवून ठेवलेली एक कोटी २३ लाख रुपये किमतीची १६० किलो वजनाची चांदीची भांडी गोदामाचे शटर तोडून चोरटयांनी लंपास केली. ही घटना भिवंडी तालुक्यातील अंजुर फाटा वसई रोडवर असलेल्या कालवार गावाच्या हद्दीतील गोदामात घडली. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
अज्ञात चोरट्यांचे कृत्य - भिवंडी तालुक्यातील अंजुर फाटा वसई रोडवर असलेल्या कालवार गावाच्या हद्दीत असलेल्या शुभम इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समधील डी लुसो नावाचे फर्निचर गोदाम आहे. या गोदामात सुमारे १६० किलो वजनाची एक कोटी २३ लाख रुपये किंमतीची चांदीची भांडी साठवून ठेवण्यात आली होती. ही चांदीची भांडी अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर उचकटून लंपास केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे करत आहेत.