महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक; एक फरार - ठाणे गुन्हे शाखा युनिट-५

ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने ५०० रुपयांच्या २ लाख ८३ हजाराच्या ५६६ नोटांसह एकाला तीनहात नाका परिसरात अटक केली आहे. काळुराम बुद्धा इंदवाळे ( वय ४०) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात नेले असता, त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ठाण्यात बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक; एक फरार

By

Published : Aug 17, 2019, 9:17 PM IST

ठाणे -भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यात अटक केली आहे. तीनहात नाका परिसरात ५०० रुपयांच्या २ लाख ८३ हजाराच्या ५६६ नोटांसह काळुराम बुद्धा इंदवाळे (वय ४०) याला अटक केली. तर एकजण फरार झाला आहे.

ठाण्यात बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक; एक फरार
गुन्हे शाखेच्या पथकाने अटक आरोपीसह फरारी आरोपीच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भादंवि ४८९(अ), ४८९(ब), ४८९(क), ३४ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक आरोपीला न्यायालयात नेले असता, त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अटक आरोपी काळुराम बुद्धा इंदवाळे (रा. तानाजी नगर, कसारा) आणि फरारी आरोपी कांती मोकाशे उर्फ कांतीलाल (रा.खर्डी) या दोघांनी संगनमताने ५०० रुपयांच्या बनावट नोटा ठाण्यात आणल्या होत्या.
ही माहिती गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला एका खबऱ्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी आरटीओ कार्यालयाजवळ आणि हायवे हॉस्पिटलसमोर सापळा रचला. पोलिसांनी संशयित म्हणून पाठीवर काळ्या रंगाची सॅक असलेल्या इंदवाळे याला ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार कांती मोकाशे उर्फ कांतीलाल हा फरार होण्यात यशस्वी झाला. पोलीस पथकाने काळ्या सॅकची तपासणी केल्यानंतर त्यात २ लाख ८३ हजाराच्या ५०० च्या बनावट नोटा सापडल्या. गुन्हे शाखेचे पथक फरारी आरोपीचा शोध घेत आहे. गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details