महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

१३ लाखांच्या घरफोडीच्या गुन्ह्याची २४ तासात उकल; मुख्य आरोपीसह मुद्देमाल हस्तगत - नारपोली पोलीस ठाणे बातमी

कपड्याचे गोडाऊन फोडून त्यातून १३ लाखांचा धाग्याचा यार्न चोरी गेल्याची तक्रार भिवंडी नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करत अवघ्या २४ तासात चोरट्याचा छडा लावत चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करून त्याला बेड्या ठोकल्या आहे. तर त्याच्या चार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

१३ लाखांच्या घरफोडीच्या गुन्ह्याची २४ तासात उकल
१३ लाखांच्या घरफोडीच्या गुन्ह्याची २४ तासात उकल

By

Published : Aug 12, 2020, 8:35 PM IST

ठाणे : भिवंडी शहरातील १३ लाखांच्या घरफोडीच्या गुन्ह्याची २४ तासात उकल करण्यात भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या एका पथकाला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून १३ लाख ३२ हजार ६४६ रुपयांचा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करून त्याला बेड्या ठोकल्या आहे. तर त्याच्या चार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अजीज मोहम्मद इद्रिस खान (वय,३६, रा, शांतीनगर भिवंडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर लकी, व शमीसह आणखी २ साथीदार असे चारजण फरार आहेत.

भिवंडी शहरात लॉकडाऊन काळात गुन्हेगारीचा आलेख कमी होता. मात्र, अनलॉक काळात पुन्हा गुन्हेगारीत वाढ झाल्याचे विविध पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या घटनांवरून दिसून येत आहे. भिवंडीतील ओसवाल वाडी परिसरात चेतन सुरजमल गढवाल हे राहत असून त्यांचे राहनाळ गावातील कांचन कंपांउंडमध्ये राजश्री वेअर हाऊस नावाने गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये कपडा तयार करण्यासाठी लागणारे धाग्याचे यार्न साठवून ठेवण्यात आले होते. नेहमीप्रमाणे ५ ऑगस्ट रोजी सायकांळच्या सुमाराला गोडाऊन बंद करून चेतन घरी गेले होते. ते पुन्हा दुसऱ्या दिवशी गोडाऊन उघडण्यासाठी आले असता त्यांना आधीपासून गोडाऊनचे शटर उचकटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी तातडीने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन गोडाऊन मधून सुमारे १३ लाख ३२ हजार ६४६ रुपयांचे धाग्याचे यार्न चोरी गेल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

यानंतर, पोलीस उपनिरीक्षक आर. जे. व्हरकाटे यांच्यासह पोलीस हवालदार सातपुते, पोना. सोनगीरे, पोलीस शिफाई जाधव, बंडगर, शिरसाठ या पोलीस पथकाने तपास सुरू केला. दरम्यान, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक व्हरकाटे यांना तांत्रिकबाबी आणि खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, घरफोडीच्या गुन्ह्यातील १ संशयित आरोपी भिवंडीतील धामणकर नाका परिसरात येणार आहे. त्या माहितीनुसार पोलीस पथकाने या ठिकाणी सापळा रचून अजीजला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केला असता, त्याने चार साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक व्हरकाटे यांनी दिली आहे. तर, या गुन्ह्यातील फरार चोरट्यांचा शोध सुरू असून लवकरच चारही चोरटे गजाआड करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details