ठाणे -सरत्या वर्षाचा निरोप व नववर्षाचे स्वागत जगभरात सर्वजण उत्साहाने करतात. मात्र, तळीराम मद्य प्राशन करत आंदन साजरा करतात. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे तळीरामांचा हिरमोड झाला आहे. मात्र, त्यांच्यासाठी एका व्यवसायिकाने 'झेपेल तेवढी प्या अन सुरक्षित घरी जा', असे अनोखे उपक्रम सुरू केले आहे. यामध्ये मद्यपीने मद्य पिल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी वाहन व चालकाची सोय करण्यात येणार आहे.
नववर्षाच्या जल्लोषात मद्यपींवर आवर घालण्यासाठी ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई करण्यासाठी मोठा फौजफाटा प्रत्येक नाक्यावर तैनात करावा लागतो. मद्य प्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालविणे, अपघात होणे, अशा दुर्दैवी घटना नववर्षाच्या स्वागताच्या दिवशीच घडतात. यंदा संचारबंदी असल्याने वेळेत घरी जाणे एवढेच आता मद्यपींच्या हातात आहे. आपल्या ग्राहकांनी सुरक्षित घरी जावे यासाठी घोडबंदर परिसरातील हॉटेल व्येवसायिकांनी हॉटेलमध्ये आलेल्या मद्यपींची मद्य घेतल्यानंतर त्यांना सुरक्षित घरी सोडण्यासाठी वाहने आणि वाहन चालक तैनात केले आहेत.
ग्राहाकांनी केले स्वागत
या उपक्रमामुळे ग्राहकाचे हित जपले जात आहे. ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह सारख्या गुन्ह्यापासून ग्राहक लांब राहणार आहेत. यामुळे अपघाताला आळा बसेल, रस्त्यावर मद्यपींचा धुमाकूळ थांबेल. हॉटेलच्या सुविधेमुळे ग्राहक जास्त मद्य प्रश्न केले तरीही त्याला सुरक्षित घरी जात येईल. त्यामुळे या संकल्पनेचे ग्राहक स्वागत करत आहेत.