ठाणे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्याप्रमाणत संख्या वाढत असतानाच तीन दिवसापासून रुंग्णांची संख्या साडे पाचशेचा आकडा पार करीत आहे. आजही शहरात ५५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण डोंबिवलीत तिसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांची संख्या साडे पाचशेच्या पार
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तीन दिवसापासून रुंग्णांची संख्या साडे पाचशेचा आकडा पार करीत आहे. आजही शहरात ५५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेत कोरोनाचा कहर सुरू असून रुग्णांनंतर शुक्रवारी विक्रमी ५६४ नवे रुग्ण आढळून आले असतानाच शनिवारी ५५५ रुग्ण आढळून आल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण रुग्ण संख्या ८ हजार ६०४ पोहोचली आहे. तर आजही कोरोना रुग्णाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यासह उच्भू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले. गुरुवारी, शुक्रवारी, शनिवार या तीन दिवसात रुग्णांच्या आकडेवारीने साडेपाचशेचा टप्पा पार केला. तर आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ३४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५ हजार १२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग इतक्या झपाट्याने झाला की गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ झाल्याने आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून आले आहे. तर सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णायलही रुग्णांनी हाऊसफुल झाले आहेत. शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांची विगतवारी पाहता सर्वाधिक रुग्णांची संख्या कल्याण पूर्व परिसरात १५२ रुग्ण तर डोंबिवली पूर्वेत १२४ आणि कल्याण पश्चिममध्ये १३७ तर डोंबिवली पश्चिमेत ८२ आणि टिटवाळा - मांडा परिसरात २० व मोहने गावात ३३ तर पिसवली गावात ७ असे एकूण एकाच दिवशी ५५५ रुग्णांची विक्रमी नोंद झाल्याने शहरातील परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे दिसून आले.