ठाणे -पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करत तिला जिंवत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील भरतनगर कानसई रोड येथे घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गंभीर भाजलेल्या पत्नीला उपचारासाठी ठाण्यातील सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमन (३०) असे जिंवत पेटवून दिलेल्या पत्नीचे नाव आहे. आत्माराम पवार असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून तो फरार झाला आहे.
धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला जिंवत पेटवून देणारा पती फरार - Thane crime news
तत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करत तिला जिंवत पेटवून दिल्याची धक्कादाय घटना ठाण्यातील उल्हास नगर शहरात घडली आहे. या प्रकरणी आत्माराम पवार याच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला जिंवत पेटवून देणारा पती फरार on-suspicion-of-the-character-the-husband-burned-his-wife-alive](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5586674-877-5586674-1578073745777.jpg)
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कॅम्प नं.४ येथील भरतनगर कानसई रोड येथे सुमन ही तिची ३ मुले व पती आत्माराम याच्यासोबत राहत होती. आत्माराम याला दारू पिण्याचे व्यसन असून तो सुमन हिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करत होता. गुरूवारी रात्री साडे १२ च्या सुमारास सुमन घरात स्वयंपाक करत असताना आत्माराम दारू पिऊन घरी आला. त्याने सुमन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण केले. तिला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यानी मारहाण केली. पतीच्या या त्रासाला कंटाळून सुमन हिने घरात असलेले डिझेल तिच्या अंगावर टाकून घेतले. त्याचवेळी आत्माराम याने त्याच्याजवळील माचीस काढून एक काडी पेटवून सुमन हिच्या अंगावर भिरकावल्याने तिच्या अंगावरील कपडयाने पेट घेतली. पीडीत पत्नी गंभीर भाजली. तिला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ७४ टक्के भाजल्याने तिला उपचारासाठी ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सुमन हिला ठार मारन्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून आत्माराम पवार याच्याविरूध्द विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्माराम हा फरार झाला असून विठ्ठलवाडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक भामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप.निरीक्षक आर.आर.पाटील करत आहेत.