नवी मुंबई - कोरोनाचा कहर वाढत असून, दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतचं आहे. शुक्रवारी नवी मुंबईत 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नवी मुंबईकरांच्या चिंतेत वाढ होत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता, अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत कार्यरत असणाऱ्या नागरिकांना तिथेच राहण्याचे आवाहन नवी मुंबई मनपाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
नवी मुंबईत शुक्रवारी आढळले नवीन 20 कोरोना पॉझिटिव्ह..250 चा आकडा पार... - corona latest news
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात आतापर्यंत 261 कोरोनाबाधित आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 3388 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 2412 जण निगेटिव्ह आले असून, 726 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 250 इतकी आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात आतापर्यंत 261 कोरोनाबाधित आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 3388 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 2412 जण निगेटिव्ह आले असून, 726 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 250 इतकी आहे. शुक्रवारी 220 जणांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 200 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 20 जण 1 मे ला कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भेमधील 7, कोपरखैरणेमधील 6, नेरुळमधील 4 व वाशीतील 3 असे एकूण 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यामध्ये एपीएमसी मार्केटमधील व्यक्तींच्या संपर्कात आल्याने 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एपीएमसीमधील 6 व्यापारी आणि कामगारांचा यात समावेश असून व्यापाऱ्यांच्या 8 नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा 250 वर गेला आहे.