ठाणेगुजरात राज्यातील वादग्रस्त बिल्किस बानो Bilkis Bano Case in State of Gujarat केसच्या ११ आरोपींना 11 Accused in Controversial निर्दोषमुक्त करण्यात आले. ते सत्कार स्वीकारत फिरत 11 Accused Walking Around Accepting Felicitations आहेत. त्यांना सोडण्यामागचे कारण काय, त्यांच्या मानसिकतेत आणि प्रवृत्तीत बदल झाला काय, असे प्रश्न उपस्थित करीत याच आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावणारे तत्कालीन सीबीआय कोर्टाचे न्यायधीश यू. डी. साळवे यांनी प्रश्न उपस्थित Former CBI Court Judge U D Salve Objection केल्याने हे प्रकरण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे.
वर्तणुकीत बदल हे महत्त्वाचे नाही,मानसिकतेत आणि प्रवृत्तीतबिल्किस बानो प्रकाराची सुनावणी आणि दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ज्या तत्कालीन सीबीआय न्यायधीश यू. डी. साळवे यांनी ठोठावलेली होती. त्याच प्रकरणात आज ११ आरोपींची सुटका करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षा सुनावणारे आणि ठाण्यात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त सीबीआय न्यायधीश यांनी वृत्तवाहिनीना दिलेल्या मुलाखतीत या निर्णयावर आक्षेप नोंदविला. या प्रकरणातील ११ आरोपी यांची सुटका झाली. मात्र, कुठल्या कारणाने त्यांच्या वर्तणुकीत बदल हे महत्त्वाचे नाही. तर त्यांच्या मानसिकतेत आणि त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडला होता काय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
निर्दोष सुटलेले हे आरोपी सत्कार घेत फिरत आहेत त्यामुळे आरोपींना सोडण्याचा निर्णय हा जरी सरकारचा असला तरीही या प्रकरणात दोषी आरोपींच्या सुटकेच्या मागे असलेल्या कारणांचा उलगडा महत्त्वाचा आहे. तर निर्दोष सुटलेले हे आरोपी सत्कार घेत फिरत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप नाही. तर त्यांच्या प्रवृत्तीत बदलही झालेला नसल्याचे सेवानिवृत्त सीबीआय न्यायधीश साळवे यांनी स्प्ष्ट केले. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत मात्र नमूद करीत सांगितले की, गुजरात राज्याच्या या निर्णयाबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गुन्ह्यातून आरोपींची सुटका होणे आणि नंतर आरोपींची सत्कार स्वीकारणे हे चुकीचे असल्याचे सांगितले.
बिल्कीस बानो प्रकरणदाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात जमाव बिल्किस बानोच्या घरात घुसला. यादरम्यान गर्भवती बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार केला, तर तिच्या कुटुंबातील 7 जणांची निर्घृण हत्या केली होती. 2008 मध्ये, मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने बिल्किस बानोला 21 जानेवारी 2008 सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली. 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्यानंतर, राधेश्याम या दोषींपैकी एकाने माफीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने गुजरात सरकारला या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली ज्याने सर्व 11 दोषींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला.