महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर ओमी कलानीने राष्ट्रवादीतूनच भरला  अर्ज, आयलानी विरुद्ध कलानी गटात रंगणार सामना

भाजपने कलानी कुटुंबाला डच्चू दिल्याचे बोलले जात असून उल्हासनगरात कलानीचे साम्राज्य अबाधित राखण्यासाठी अखेर राष्ट्रवादीतूनच ओमी कलानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता पुन्हा कुमार अलायनी विरुद्ध कलानी गटात सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

By

Published : Oct 4, 2019, 5:37 PM IST

Updated : Oct 4, 2019, 6:18 PM IST

संपादित छायाचित्र

ठाणे -उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी सुनेला भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून काही दिवसांपूर्वी तडकाफडकी आमदार पदाचा राजीनामा दिला. मात्र, भाजपने माजी आमदार व जिल्हा अध्यक्ष कुमार आयलानी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपने कलानी कुटुंबाला 'थड' दिल्याचे बोलले जात असून उल्हासनगरात कलानीचे साम्राज्य अबाधित राखण्यासाठी अखेर राष्ट्रवादीतूनच ओमी कलानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता पुन्हा आयलानी विरुद्ध कलानी गटात सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओमी कलानी यांची प्रतिक्रिया

भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी हे माजी आमदार आहेत. त्यांनी 2009 मध्ये कुख्यात पप्पू कलानी यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यामुळे अवघ्या 1800 मतांनी कुमार आयलानी यांचा आमदार ज्योती कलानी यांनी पराभव केला होता. मात्र, त्यानंतरही कुमार यांनी त्यांचे काम नेटाने सुरू ठेवत कलानी यांना शह दिला होता. आमदार ज्योती कलानी यांच्या ऐवजी कलानी कुटुंबाची सून महापौर पंचम कलानी या विधानसभेच्या रिंगणात भाजपच्या तिकीटावर उतरण्याच्या तयारीत होत्या. मात्र, पंचम यांना भाजपने उमेदवारी नाकारून पुन्हा कुमार आयलानी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कलानी कुटुंबाला पुन्हा राष्ट्रवादी शिवाय पर्यायी नसल्याचे समोर आले.

हेही वाचा - 'आता बारा वाजणार'; प्रकाश मेहतांचा इशारा

दरम्यान, राष्ट्रवादीतून शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज ओमी कलानी यांनी शक्तीप्रदर्शन करून भरला, तर भाजपच्यावतीने कुमार आयलानी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांची पत्नी पंचम या भाजपच्या पाठिब्यांवर महापौर आहेत. आता पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये प्रचारादरम्यान राजकीय युद्ध पाहवयास मिळणार आहे. मात्र, या राजकीय युद्धामुळे पंचम कलानी यांच्या महापौर पदावर पाणी सोडावे लागेल, हे नक्की झाले आहे.

हेही वाचा -विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन

Last Updated : Oct 4, 2019, 6:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details