ठाणे - पाच दिवसांपूर्वी एका वयोवृद्ध महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बाजारपेठ पोलिसांनी केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वासू उर्फ विजेंद्र कृष्णा ठाकरे (वय 35, रा. वाडेकर पाडा, कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर हंसाबेन प्रवीण भाई ठक्कर (वय-70) असे मृत महिलेचे नाव आहे.
अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे याबाबत बोलताना. चोरीच्या उद्देशाने घुसला होता महिलेच्या घरात -
कल्याण-पश्चिम परिसरातील दत्तआळी येथील झुंजारराव इमारतीमध्ये मृत हंसाबेन एकटीच राहत होत्या. 27 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने निर्भयपणे धारदार शस्त्राने तिची गळा चिरून खून झाल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंतराव चव्हाण यांनी पथकासह या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलीस तपासात वयोवृद्ध महिलेच्या घरी कचरा काढण्यासाठी अधूनमधून आरोपी वासू हा येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
कर्जबाजारी असल्याने पैसे व दागिने चोरीचा मार्ग -
आरोपी वासू हा कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी त्याने मृत महिलेवर सतत पाळत ठेवून घराची रेखी केली होती. तिच्या घरातील पैसे व दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने त्या रात्री घरात घुसला. मात्र, वृद्ध महिलेने त्याला विरोध केल्याने त्याने तिच्यावर चाकूहल्ला करून तिला जागीच हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा दिवसा केडीएमसीच्या घंटागाडीवर कचरा उचलण्याचे तर सायंकाळी पावभाजीच्या गाडीवर काम करत होता. आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय अहिरे करीत आहेत.
हेही वाचा -प्राप्तिकर विभागाची सलग तिसर्या दिवशी छापेमारी सुरू