ठाणे:काही महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांना तुम्ही आम्हाला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आहे का? असे विचारले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी फेक आकाऊंट तयार करत महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेसेज करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला. मात्र, त्याने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला याचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत. मात्र, या प्रकरणात सूत्रधाराला लवकरच अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.
व्हायरल व्हिडीओ नंतर फ्रेंड रिक्वेस्टचा प्रकार?काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व विधानसभेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या आवाजा ऐवजी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज टाकण्यात आला होता. या प्रकरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना त्यांच्या नावाने फेसबूकवर फेक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे महिलांना 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठविली जात होती. त्यामध्ये हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, तुम्ही भेटू शकता का ? असा मेसेज आमदाराच्या फेक फेसबुकवरून पाठविला जात होता. त्यापैकी काही महिलांनी थेट आमदार गायकवाड यांना साहेब तुम्ही मला फेसबूकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आहे का? अशी विचारणा केली. हे ऐकून गायकवाड यांनी धक्काच बसला.