महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धावत्या 'लालपरी'च्या एका चाकाचे नटबोल्टच निखळले ; अन ... - एसटीच्या बसच्या चाकाचे नट बोल्ड निखळले

धावत्या बसच्या एका चाकाचे नटबोल्ट निखळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वेळेतच बस चालकाला घटनेची माहिती मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

nut bolt of the running ST bus came loose
धावत्या 'लालपरी'च्या एका चाकाचे नटबोल्टच निखळले ; अन ...

By

Published : Feb 16, 2021, 3:42 PM IST

ठाणे - सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाचे साधन असलेल्या धावत्या लालपरीच्या एका चाकाचे नटबोल्टच निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी बसेसच्या वेळोवेळी देखभाल दुरुस्तीचा प्रश्न अशा प्रकारे हाताळला जातो का? असा सवाल उपस्थित होऊन राज्य एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार या घटनेमुळे उघडकीस आला आहे. दुसरीकडे वेळेतच बस चालकाला घटनेची माहिती मिळाल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली आहे.

बसची चाचणी केली नव्हती का ?

पेणहुन जळगावला जाणारी एस टी बस कल्याण शिळ रोडवर मानपाडा भागात ही एसटी भररस्त्यात थांबली होती. त्यावेळी कल्याणमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी त्या मार्गाने जात असतांना त्यांची नजर या लालपरीवर पडली. त्यांनतर एसटी चालक आणि वाहकाला या बाबत चौकशी केली असता चालकाने सांगितले कि, बसमधील एका चाकाचे नटबोल्ट निखळून पडले आहेत. ही घटना कळताच बसमधील प्रवाशांना पटापट खाली उतरविण्यात आले आणि उतवरून ही बस दुरुस्तीसाठी कल्याण बस आगाराला संपर्क करण्यात आला. योगेश दळवी यांनी बसचे चित्रीकरण करून धावत्या एसटीचे नटबोल्ट कसे निखळून पडले पर्यत हे कोणालाही माहिती नाही असा प्रश्न विचारला आहे. यावेळी ही बस डेपोमधून निघताना बसची चाचणी केली नव्हती. हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु असून शासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी योगेश दळवी यांनी केली आहे. याबाबत कल्याण बस आगाराचे व्यवस्थापाक विजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, ही बस पनवेल आगाराची असून कल्याण मुरुड मार्गावर चालणारी आहे. या बसच्या दुरुस्तीचे काम सध्या कल्याण बस डेपोच्या गॅरेजमध्ये सुरु असल्याचे सांगत अधिक माहिती देणे मात्र टाळले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details