महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 21, 2021, 1:30 PM IST

ETV Bharat / state

परीचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात; मुंबईसह 25 जिल्ह्यात दोन तास निदर्शने

प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 21 जूनपासून काम बंद आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण संचालक यांना पत्रही पाठवले.

परीचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात
परीचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात

मुंबई- प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी परिचरिकांनी आजपासून (सोमवार) काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मुंबईसह 24 जिल्ह्यात आज सकाळी 8 ते 10 या वेळेत परिचरिकांनी रुग्णालय आवारात निदर्शने करत आंदोलन केले. तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. तसेच 24 जूनपर्यंत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 25 जूनपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचरिका संघटनेने यावेळी दिला आहे.

परीचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात
या आहेत मागण्याराज्यात सरकारी रुग्णालयात परिचरिकांची संख्या कमी आहे. अनेक वर्षे रिक्त पदे भरली न गेल्याने ही संख्या कमी असून सद्या सेवेत असलेल्या परिचरिकांवर कामाचा ताण आहे. तर कॊरोना काळात हा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे भरावी आणि पदोन्नती द्यावी, अशी मुख्य मागणी परिचरिकांची आहे. कोविड काळात सरकारी परिचारिका जिवाची बाजी लावत रुग्णसेवा देत आहेत. पण त्यांना योग्य तो मोबदला मिळताना दिसत नाही. त्यामुळे कोविड भत्ता वाढवावा, केंद्र सरकारप्रमाणे कोविड भत्ता द्यावा, अशी दुसरी मागणी आहे. त्याचबरोबर कोरोना काळात 7 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी द्यावी, शिल्लक रजेचा प्रश्न आणि अन्य मागण्या या संघटनेच्या आहेत. या मागण्यांसाठी संघटना कित्येक महिने विविध माध्यमातून आंदोलन करत आहे. पण त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.जे जे रुग्णालयात जोरदार निदर्शनेप्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 21 जूनपासून काम बंद आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण संचालक यांना पत्रही पाठवले. मात्र, तरीही आठवड्याभरात कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आजपासून राज्यभरातील परिचरिकानी दोन तास काम बंद आंदोलन केले. जे जे रुग्णालयात मोठ्या संख्येने सकाळी परिचरिका जमा झाल्या आणि त्यांनी जोरदार निदर्शने केली. लातूर शासकीय रुग्णालयात ही सकाळी दोन तास आंदोलन झाले. तर राज्यभरात 25 जिल्ह्यात आंदोलन झाल्याची माहिती सुमित्रा तोटे, सचिव, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांनी दिली आहे. दरम्यान जे जे रुग्णालयात आंदोलनाचे वार्तांकन करण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details