नवी मुंबई -शहराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 103 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 114 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यामध्ये 103 नागरिक नवी मुंबईत राहणारे आहेत, तर उर्वरित 11 हे इतर भागातील होते.
नवी मुंबईत कोरोनाबधितांनी गाठली शंभरी, 6 नव्या रुग्णांची भर - News about Corona virus
आज नवी मुंबईत कोरोनाचे नवीन 114 रुग्ण आढळले. यातील 103 नवी मुंबईत राहणारे असून उर्वरित 11 इतर भागातील आहेत.

नवी मुंबईत कोरोना बधितांची गाठली शंभरी, 6 कोरोना बधितांची वाढ
नवी मुंबईत कोरोना बधितांची गाठली शंभरी, 6 कोरोना बधितांची वाढ
आतापर्यंत नवी मुंबई शहरात 1620 नागरिकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये 103 जण कोविड 19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 433जणांचे कोविड 19 चे अहवाल येणे प्रलंबित आहे. 27 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. 24 एप्रिलला 6 जणांचे कोविड 19 चे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये तुर्भे परिसरातील 2, नेरुळ मधील 1, कोपर खैरणे 1,घणसोली 1, वाशीमध्ये 1 असे 6 रुग्ण आढळले आहेत.