महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या महामारीतही डोंबिवलीतील एनयूएचएमचे १९२ कर्मचारी किमान वेतनापासून वंचित - डोंबिवली एनयूएचएम किमान वेतन न्यूज

कल्याण-डोंबिवली मनपाच्या आरोग्य विभागात एनयूएचएमअंतर्गत १९२ जण कार्यरत आहेत. त्यात नर्स व वैद्यकीय सेवेशी संबंधित तंत्रज्ञांचा समावेश आहे. महापालिका प्रशासन २०१५ पासून त्यांना राबवून घेत आहे. त्यांना दर महिन्याला ८ हजार ६४० रुपये वेतन दिले जात असून त्याची रक्कम महापालिकेला सरकारकडून प्राप्त होते. त्यांना पुरेशा सोयीसुविधाही दिल्या जात नसल्याने या सर्व नर्सनी सोमवारी महानगरपालिका मुख्यालय गाठून प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

Nurse
नर्स

By

Published : Jun 30, 2020, 6:50 PM IST

ठाणे - कोरोनाशी लढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने नर्स व डॉक्टरांची नव्याने भरती सुरू केली आहे. मात्र,‘नॅशनल अर्बन हेल्थ मिशन’(एनयूएचएम) मधील १९२ नर्स आणि तंत्रज्ञ किमान वेतनापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यांना पुरेशा सोयीसुविधाही दिल्या जात नसल्याने या सर्व नर्सनी सोमवारी महानगरपालिका मुख्यालय गाठून प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मात्र, या सगळ्या आरोपांविषयी पालिका प्रशासनाने मौन धारण केले आहे.

डोंबिवलीतील एनयूएचएमचे १९२ कर्मचारी किमान वेतनापासून वंचीत

कल्याण-डोंबिवली मनपाच्या आरोग्य विभागात एनयूएचएमअंतर्गत १९२ जण कार्यरत आहेत. त्यात नर्स व वैद्यकीय सेवेशी संबंधित तंत्रज्ञांचा समावेश आहे. महापालिका प्रशासन २०१५ पासून त्यांना राबवून घेत आहे. त्यांना दर महिन्याला ८ हजार ६४० रुपये वेतन दिले जात असून त्याची रक्कम महापालिकेला सरकारकडून प्राप्त होते. त्यामुळे मनपाला या कर्मचाऱ्यांचा काहीही भार नाही.

सध्या महानगरपालिका हद्दीत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या तीन दिवसापासून दर दिवशी चारशे पेक्षा जास्त कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नर्स, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय, डॉक्टरची भरती सुरू केली आहे. त्यातील डॉक्टरांना तर ६५ हजार ते २ लाखांपर्यंत पगार देण्याची हमी दिली आहे. तसेच कोविडपुरतेच घेतल्या जाणाऱ्या नर्सना १७ ते ३० हजार रुपयांदरम्यान पगार दिला जाणार आहे. मात्र, एनयूएचएममधील १९२ जण आधीपासून कार्यरत आहेत. कोविड काळात रूग्ण भरती, रूग्ण इतरत्र हलवणे, सर्वेक्षण करणे, बाह्यरुग्ण कक्ष सांभाळणे, अशी कामे हे करत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असताना नव्या भरती झालेल्या नर्सला २५ हजार, तर आम्हाला आठ हजार ६४० रुपये पगार, हा कुठला न्याय आहे? असा संतप्त सवाल या नर्सनी केला आहे.

महानगरपालिका नव्या भरतीवर १४ कोटी रुपये खर्च करणार आहे. अन्य महानगरपालिकांमध्ये एनयूएचएमच्या कर्मचाऱयांना २५ हजार किमान वेतन दिले जात आहे. कोविड काळात नर्स व अन्य पॅरामेडिकल स्टाफला वैद्यकीय भत्ताही दिला जात आहे. त्याप्रमाणे वेतन, भत्ते आणि वैद्यकीय सुरक्षा देण्याची मागणी या नर्सेसने केली आहे. आमच्यापैकी कोणाला ताप, सर्दी, खोकला झाला तर ‘टाटा आमंत्र’ येथे पाठवले जाते. अन्य डॉक्टर आणि नर्सला खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. हा दुजाभाव का, असा प्रश्न या नर्सनी ईटीव्ही भारतशी बोलताना विचारला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details