ठाणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॉग्रेसने त्यांच्या सरकारच्या काळात भारतरत्न दिले नाही. जनसंघाचे सरकार आल्यावर त्यांना भारतरत्न मिळाले, असा आरोप भाजपचे खासदार डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केला आहे. ठाण्यातील श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्थेद्वारा आयोजित नवचेतना व्याख्यान मालेला डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी हे वक्ते म्हणून आले होते. यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.
संबोधन देताना डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते. विदेशात जाऊन त्यांनी बॅरिस्टर पदवी घेतली. भारतात आल्यानंतर त्यांनी संविधान लिहीले. याउलट जवाहरलाल नेहरू हे विदेशात जाऊन नापास झाले. त्यांना पदवी मिळवता आली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने विद्वान आणि पंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकरच होते. मात्र, काँग्रेस सरकारने त्यांना भारत रत्न दिले नाही, असा आरोप डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केला.
श्रीराम हे मनुष्य आणि राजाच्या रूपात होते. रामाप्रमाणे नैतिक आणि त्यांच्या मार्गानुसार आचरण केले पाहिजे. हिंदूसाठी आयोध्याची रामभूमी, मथुरेचे श्रीकृष्ण आणि काशिविश्वनाथ या तीन पुण्यभूमी महत्वाच्या आहेत. आता २०२२ पर्यंत राम मंदिर पूर्ण होईल. रामाचे नाव घेऊन देशात पुर्नउद्धान करून समाजाला एक करण्याचा प्रयत्न आहे. विभाजनाला मिटवायचे आहे, असे सुब्रम्हण्यम स्वामी यांनी म्हटले.
काँग्रेस सरकारने रामसेतू तोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांच्या सांगण्यावरून मी सुप्रीम कोर्टात याचीका दाखल केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टात बाजू मांडत राम सेतू तोडू दिला नाही. यावर डीएमकेचे करुणानिधी यांना हे चांगलेच झोंबले होते. बाबरी मस्जिद पाडल्याने त्यांना रामसेतू पाडून तो बदला घ्यायचा होता अशी त्यांची निती होती, असा आरोप स्वामी यांनी केला. आतापर्यंत इतिहासात महिलांना न्याय आणि स्थान दिले. पण एका महिलेला कधीच मी पंतप्रधान बनू देणार नाही आणि दिलेही नाही, असा टोला डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी सोनिया गांधीना लगावला.
हेही वाचा-डोंबिवलीकर शेफ 25 हजार बटाटेवडे तळून 'लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंदवणार विक्रम