महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईकरांना सुखद धक्का; '2025 पर्यंत करवाढ नाही'

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत घोषणांचा पाऊस पडू लागला आहे. या अगोदर मालमत्ता करामध्ये सूट देणे, वाहनतळ नि:शुल्क करणे व कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेण्याचे अशासकीय ठराव मंजूर करण्यात आले आहेत.

By

Published : Jan 22, 2020, 5:12 PM IST

no-tax-increase-till-2025-in-navi-mumbai
no-tax-increase-till-2025-in-navi-mumbai

नवी मुंबई- येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबईत निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांनी २०२५ पर्यंत नवी मुंबईत मालमत्ता व पाणीपट्टी दरात वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. यामुळे नवी मुंबईकरांना सुखद धक्का मिळाला आहे. मात्र, येत्या निवडणुकीमध्ये आपला निभाव लागावा म्हणून अशा प्रकारच्या घोषणा भाजप करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

हेही वाचा-'त्या' आंदोलक शेतकऱ्याची भाजपवर भिस्त.. आजी मुख्यमंत्र्यांकडून न्याय न मिळाल्याने माजी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत घोषणांचा पाऊस पडू लागला आहे. या अगोदर मालमत्ता करामध्ये सूट देणे, वाहनतळ नि:शुल्क करणे व कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेण्याचे अशासकीय ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, आता नाईक यांनी शहरात २०२५ पर्यंत मालमत्ता व पाणीपट्टी दरामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर स्थापनेपासून गणेश नाईक यांचे वर्चस्व राहिले आहे. सत्ताधारी पक्षही गणेश नाईक यांचा राहिला आहे.

यापूर्वीही २० वर्षे कोणतीही करवाढ केली जाणार नसल्याची घोषणा गणेश नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. आत्ता पुन्हा पुढील पाच वर्षांसाठीची करवाढ होणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. नवी मुंबईची प्रगती करताना नागरिकांवर करवाढीचा कोणताही बोजा येऊ नये म्हणून ही घोषणा केली केली आहे. तसेच पर्यायी मार्गातून पालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबई महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून २ हजार ५०० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. क्रिसिल या संस्थेकडून नवी मुंबई महापालिकेला 'डबल ए प्लस स्टेबल' पथमानांकन देण्यात आले आहे. यामुळे पुढील पाच वर्षे करवाढ होणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details