ठाणे : शिवसेनेची पूर्ण सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेना वर्चस्व गाजवत होती. ( No sign of BJP and balasaheb shivSena alliance ) मात्र राष्ट्रवादीचा विरोध आणि भाजपची नसलेले साथ आगामी महानगरपालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेला अडचणीत आणणार आहे. या आगामी निवडणुकीत यामुळे भाजपसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील सोबत असलेली पाहायला मिळत आहे. ( upcoming municipal elections in thane ) निधी न मिळणे पदांचे वाटप व्यवस्थित न करणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी भाजपचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांकडे आणि प्रशासनाकडे वारंवार करत होते. निधी न मिळाल्याने प्रभागांमध्ये विकास कामे रखडलेली आहेत आणि यामुळे निवडणुकीत भाजपला अडचण होऊ शकते हे लक्षात घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून असा प्रकारे जाणून बुजून प्रयत्न करण्यात आला आणि यामुळे नाराज झालेल्या भाजपने सत्तेत एकत्र असूनही बाळासाहेबांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसलेली आहे. (Thane municipal election )
पूर्ण सत्तेचा माज :भाजपच्या काही नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला पूर्ण सत्ता मिळाल्याचा माज असल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला देखील चांगले यश मिळेल आणि मग त्यावर आम्ही विचार करू असे देखील सांगितला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील ( Uddhav Thackeray group ) नगरसेवकांच्या झालेल्या अडचणी या मतदारांना पसंत पडलेल्या नाहीत आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या भांडणांमध्ये एकनाथ शिंदे गटाकडे जरी आकडेवारी जास्त दिसत असली तरीही आकडेवारी आगामी निवडणुकीत कमी झालेली पाहायला मिळू शकते असे जाणकार सांगतात.