ठाणे -शहापूरच्या वेहळोली गावातून बर्ड फ्लू हद्दपार ( no bird flu in thane ) करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे, असे असले तरी गाफील न राहता प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन करत वेहळोलीसह एक किमी परिघातील परिसर पुन्हा पिंजून काढला आहे. यावेळी कुठेही कोंबड्या सापडल्या नाहीत. त्यामुळे निर्जंतुकीकरणानंतर पुढचे पाऊल म्हणून आता परिसरातील ६० पाळीव डुकरांच्या रक्ताचेही नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच येथील रहिवाशांपैकी कुणाला तापाची लक्षणे आळल्यास त्यांच्यांही रक्ताचे नमुने तातडीने घेण्याच्या सुचना संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्यात आले, असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
8 हजार कोंबड्या केल्या नष्ट -
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील ३०० कोंबड्या अचानक दगावल्याचे १७ फ्रेब्रुवारीला निदर्शनास आले होते. बर्ड फ्लूने या कोंबड्या दगावल्याचे अहवालात निष्पन्न होताच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आधिसुचना काढत वेहळोलीचा एक किलोमीटर त्रिज्येतील परिसर संसर्ग बाधित म्हणून घोषीत केला. त्यानंतर तातडीने कुक्कुट पक्षांचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या त्यांच्यामार्फत शिघ्रकृती दल तयार करून त्यांच्यामार्फत कोंबड्या व अंडी, खाद्य नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली. त्यानुसार बाधित क्षेत्रातील सहा पोल्र्टी फार्ममधील १५ हजार ६०० ब्रॉयलर, अंडी देण्यायोग्य ७ हजार ९६२ कोंबड्या, २० बदके, ९८० हून अधिक अंडी, पिल्ले, खाद्य नष्ट करण्यात आले आहे. या सर्व कोंबड्यांना संसर्ग नव्हता. पण बर्ड फ्लूला हद्दपार करण्यासाठी त्यांना नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
'कामगारांच्या संपर्कात आरोग्य विभाग'
आजच्या घडीला या परिसरातील कोंबड्यांची सर्व खुराड रिकामी झाले असून वेळीच पाऊले उचलल्याने जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शुक्रवारी कोंबड्या, अंडी नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच सर्व पोल्र्टी फार्म, चिकन सेंटर बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही कुठे चोरी छुपे व्यवहार सुरू आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी विशेष पथकाद्वारी रविवारी वेहळोली गावासह परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी कुठेही कोंबड्या सापडल्या नाहीत. पण हा संसर्ग माणसांपर्यंत पोहचला की नाही याची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी पोल्र्टी फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या संपर्कात आरोग्य विभाग आहे. यशिवाय पाळीव ६० डुकरांचेही रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य सेवकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून कुणीही संशयीत आढळल्यास तत्काळ रक्ताचे नमुने घेण्याच्या सुचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
घाबरू नका, पण सतर्क रहा -