महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतितीव्र वादळाने वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता; नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन - nisarga cyclone effect thane news

पुढील काही तासात निसर्ग चक्रीवादळ हे रौद्र रूप धारण करू शकते, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. संभाव्य अतितीव्र वादळामुळे महावितरणच्या या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. चक्री वादळामुळे मोठे नुकसान आणि. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन वीज ग्राहकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

अतितीव्र वादळाने वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता
अतितीव्र वादळाने वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता

By

Published : Jun 2, 2020, 8:40 PM IST

ठाणे - अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ३ आणि ४ जून रोजी अतितीव्र चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळामुळे कल्याण परिमंडळातील वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होऊन वीजपुरवठा बाधित होण्याची तसेच अपघाताची शक्यता लक्षात घेऊन वीज ग्राहकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागाने ताज्या स्थितीचा अंदाज घेऊन निसर्ग चक्रीवादळ अत्यंत तीव्र असेल अशी शक्यता वर्तविली आहे. पुढील काही तासात हे वादळ रौद्र रूप धारण करू शकते, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. सध्या जिल्ह्यातील महावितरणची बहुतांश वीज वितरण यंत्रणा उघड्यावर आहे. संभाव्य अतितीव्र वादळामुळे महावितरणच्या या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. चक्री वादळामुळे विजेचे खांब, रोहित्र कोसळण्यासोबतच वीजवाहक ताराही तुटू शकतात. परिणामी अशा ठिकाणी दीर्घ काळापर्यंत वीजपुरवठा बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महावितरणने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन या परिस्थतीला तोंड देण्याची तयारी केली आहे. परंतु, संभाव्य अडचण पाहता नागरिकांनी मोबाईल, इन्व्हर्टर संपूर्णपणे चार्ज करून ठेवावेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवाव्यात, जेणेकरून अडचणीच्या परिस्थितीत त्रास होणार नाही. अपघातांची शक्यता गृहीत धरून वीज वितरण यंत्रणांपासून सुरक्षित अंतर राखावे व संभाव्य नैसर्गिक आपत्तीत महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details