महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! नऊ वर्षाच्या मुलीची हत्या; मृतदेह फेकला कसारा घाटात, दोघे गजाआड - ठाणे गुन्हे बातम्या

भारतीला इंग्लिश पद्धतीच्या कमोडवर शौचास बसता येत नव्हते. 07 नोव्हेंबरला तिने कपड्यांमध्ये लघुशंका केली. यावेळी राग अनावर झालेल्या प्रकाशने....

nine-year-old girl was killed and thrown in kasara valley
नऊ वर्षाच्या मुलीची हत्या करुन मृतदेह कसारा घाटात फेकला

By

Published : Dec 13, 2019, 9:30 AM IST

Updated : Dec 13, 2019, 9:42 AM IST

ठाणे - शिक्षण देण्याच्या बहाण्याने घेऊन आलेल्या नऊ वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी या मुलीचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला. हत्या करणाऱया व मृतदेहाची टेम्पोने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड यांनी दिली.

हत्या करणाऱया व मृतदेहाची टेम्पोने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड यांनी दिली.

आरोपीने मृत पावलेल्या मावस भावाच्या मुलीला चांगल्या शिक्षणाचे आमिष दाखवून स्वत:कडे आणले होते. या मृत भावाच्या कुटुंबीयांच्या डबघाईला आलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याने हे कृत्य केले. तसेच मुलगी मोठी झाल्यानंतर तिला वाममार्गाला लावण्याचा आरोपीचा उद्देश होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनाक्रम

हिना नवनाथ चव्हाण (रा. मु.पो. चाफेनेर ता-कन्नड, जि-औरंगाबाद) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानुसार त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलीला सहा महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी नात्यातील प्रकाश उर्फ हज्जू हरी राठोड (रा. धावगी रोड, उत्तन जि-ठाणे) याच्याकडे पाठवले होते. परंतु, काही दिवसांपासून तिच्याशी संपर्क साधता येत नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवली. यानंतर उत्तान सागरी पोलिसांनी पथके तयार करुन संबंधित मुलीचा शोध सुरू केला.

यादरम्यान पोलीस पथकाने तक्रारदाराच्या दिराकडे चौकशी केल्यानंतर तो गायब असल्याचे समोर आले. तत्काळ पोलिसांनी प्रकाश राठोड कुटुंबीयांचा शोध सुरू केला. त्याची पत्नी अनिता अन्य एका नातेवाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये मृत मुलीला प्रकाशने शिक्षणासाठी आणल्याची त्यांनी कबूली दिली. परंतु, तिला शाळेत घातले नाही. तसेच संबंधित चिमुरडीचा घरकामासाठी वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. घरकाम न केल्यास तिला मारहाण करत असल्याची माहिती अधिक चौकशीत समोर आली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन कसारा घाटात फेकलेला ड्रम काढला; आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी अनिता राठोड याला 09 नोव्हेंबरला आणि यानंतर आरोपी आकाश चव्हाणला 10 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. सध्या न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली असून ठाणे ग्रामीण पोलीस मुख्य आरोपी प्रकाश राठोडचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण ?

भारतीला इंग्लिश पद्धतीच्या कमोडवर शौचास बसता येत नव्हते. 07 नोव्हेंबरला तिने कपड्यांमध्ये लघुशंका केली. यावेळी राग अनावर झालेल्या प्रकाशने लाथाबुक्यांनी मारहाण करुन तिचा गळा आवळला. भारती हालचाल करत नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे आरोपीच्या लक्षात आले. यानंतर आरोपी प्रकाश आणि अनिता यांनी चिमुरडीचा मृतदेह नायलॉनच्या पोत्यात बांधून प्लास्टिक ड्रममध्ये ठेवला. तसेच दुर्गंधी टाळण्यासाठी ड्रम सिमेंटने सीलबंद केला.

10 नोव्हेंबरला आरोपीचा नातेवाईक अशोक चव्हाणला बोलावून घेण्यात आले. यानंतर त्याला घडलेल्या प्रकारची माहिती देऊन 11 नोव्हेंबरला संध्याकाळी घरातील सामान काश्मीर येथे नेण्याचे सांगितले. या दोघांनी मिळून संबंधित मुलीचा मृतदेह कसारा घाटात फेकल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

Last Updated : Dec 13, 2019, 9:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details