महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंदी असलेल्या बीएसआयव्ही वाहनांची विक्री करणारी टोळी गजाआड; 151 गाड्या जप्त - 151 गाड्या जप्त

स्क्रॅप मधून खरेदी केलेल्या 406 नवीन गाड्या आरोपींनीभंगारात न काढता बनावट चेसी नंबर, कागदपत्र, नंबर प्लेट तयार करून देशांतील विविध राज्यांत विकून टाकल्या. यातील 151 गाड्या जप्त करण्यात नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाहनांची विक्री करणारी टोळी गजाआड; 151 गाड्या जप्त

By

Published : Mar 4, 2021, 6:57 AM IST

नवी मुंबई- सरकारने देशात विक्री आणि वापर करण्यासाठी 'बीएसआयव्ही' श्रेणीतील गाड्यांना बंदी आहे. मात्र, बनावट कागदपत्रे, आणि गाडीचे नंबर देऊन, सेकंड हॅन्ड कार म्हणून सर्वसामान्यांना या श्रेणीतील वाहने विकणारी आंतरराज्यीय टोळी सक्रीय होती. नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखा-2 च्या पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १५१ गाड्या जप्त केल्या आहेत.

मार्च 2020 मध्ये कार वापरण्यास सरकाने केली बंदी-

बीएसआयव्हीच्या इंजिनमुळे प्रदूषण वाढत असल्याने, मार्च 2020 मध्ये या कार वापरण्यास आणि विक्री करण्यास सरकारने बंदी घातली होती. शासनाने बंदी घातल्यामुळे मारुती सुझुकी कंपनीच्या या ब्रिजा सियाज, सेलिरिओ, वँगेनर, इको बलेनो एक्रॉस अशा वेगवेगळ्या कंपनीच्या कार पुराच्या पाण्यात भिजल्याने स्क्रॅप म्हणून मारुती कंपनीने लिलावात काढल्या होत्या. स्क्रॅप मधून खरेदी केलेल्या 406 नवीन गाड्या आरोपींनी
भंगारात न काढता बनावट चेसी नंबर, कागदपत्र, नंबर प्लेट तयार करून देशांतील विविध राज्यांत विकून टाकल्या. यातील 151 गाड्या जप्त करण्यात नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पनवेल मधील पुरात गाड्या भिजल्याचे कारण देत देशभरात विक्री-

पनवेल मधील पुरात भिजलेल्या गाड्या असल्याचे सांगत आरोपींनी सेकंडहॅन्ड कार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना कमी किंमतीत बीएसआयव्ही इंजिन असलेल्या गाड्या संपूर्ण देशभरात विकल्या. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, हिमाचल आधी राज्यांत या गाड्या विकण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details