ठाणे- दोन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेला पतीच्या विकृत चाळ्यांना सामोरे जावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. अखेर रोजच्या अनैसर्गिक कृत्यांनी त्रस्त झालेल्या विवाहितेने भोईवाडा पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
नवविवाहित पत्नीवर विकृत पतीचा अनैसर्गिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पती फरार - नवविवाहित
कैस मेहमूद खान याचा नुकतेच भिवंडीतील धोबी तलाव येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीसोबत विवाह झाला होता. मात्र, त्याने लग्नानंतर पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करून तिला त्रस्त करून सोडले होते. अखेर या रोजच्या विकृत चाळ्यांनी बेजार झालेल्या नवविवाहितेने भोईवाडा पोलीस ठाणे गाठून पती विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
कैस मेहमूद खान ( २६ रा. आजमी अपार्टमेंट ) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. आरोपी कैस याचा नुकतेच भिवंडीतील धोबी तलाव येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीसोबत विवाह झाला होता. मात्र, त्याने लग्नानंतर पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करून तिला त्रस्त करून सोडले होते. अखेर या रोजच्या विकृत चाळ्यांनी बेजार झालेल्या नवविवाहितेने सदर बाब आपल्या माहेरच्या कुटुंबीयांना सांगितली.
त्यानंतर पीडित पत्नीने भोईवाडा पोलीस ठाणे गाठून पती विरोधात भा. दं. वि. ३७७ ,३२३, ५०६ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण कैस यास लागताच तो राहत्या घरातून पळ काढून फरार झाला. त्याचा शोध पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव घेत आहेत.