नवी मुंबई - नववर्षाचे स्वागत नवी मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात केले. मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरांमधील हॉटेल्सच्या बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. परिसरामधील वृक्षही रोषणाईने उजळले होते. येथील प्रत्येक मॉलमध्ये ख्रिसमसपासूनच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही संगीत कार्यक्रम व इतर उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
नववर्षाचे उत्साहात स्वागत; नवी मुंबईकरांचा जल्लोष - नवी मुंबई न्यूज
येथील प्रत्येक मॉलमध्ये ख्रिसमसपासूनच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही संगीत कार्यक्रम व इतर उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या मध्यरात्री ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच रोडवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रमुख रोडवर बंदोबस्त वाढवला होता. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयालाही रोषणाई करण्यात आली आहे.
दरम्यान, 1 जानेवारी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापनदिन असल्यामुळे पामबीच रोडवरील मुख्यालयाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यावर्षीही मोठया प्रमाणात नवी मुंबईकरांनी पालिका मुख्यालयासमोर गर्दी करत नववर्षाचे स्वागत केले.