महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण डोंबिवलीत नव्याने 29 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दोघांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या २४ तासात पुन्हा 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे, महापालिका हद्दीत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 422 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी आतापर्यत 40 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 812 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली
कल्याण डोंबिवली

By

Published : Jun 7, 2020, 9:38 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच आहे. गेल्या 24 तासात नव्याने 29 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेकडील चाळ परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. तर, कल्याण पूर्व आणि पश्चिममध्ये प्रत्येकी एक अशा दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात पुन्हा 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे, एकंदरीतच महापालिका हद्दीत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 422 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी आतापर्यत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे 812 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत 572 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार कल्याण पूर्वेत 480, कल्याण पश्चिममध्ये 278, डोंबिवली पूर्वमध्ये 300, डोंबिवली पश्चिमेत 242, मांडा टिटवाळा 77, अंबिवलीमध्ये 26, शहाडमध्ये 7, ठाकुर्ली परिसरात 10 तर मोहने गावात 8 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आतापर्यत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details