महाराष्ट्र

maharashtra

नवी मुंबईत आज 321 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू; 85 जण कोरोनामुक्त

By

Published : Jun 24, 2020, 7:22 PM IST

नवी मुंबईत आज चक्क 321 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, आज 85 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून आज तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत 321 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
नवी मुंबईत 321 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

नवी मुंबई -नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांनी पाच हजारांचा आकडा पार केला असून, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आज (बुधवार) आढळली आहे. आज चक्क 321 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, आज 85 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 18 दिवसांत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नवी मुंबईत झपाट्याने वाढत असून यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. नवी मुंबईत 5 हजार 404 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 18 हजार 62 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 11 हजार 845 जण निगेटिव्ह आले असून, 824 जणांची तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये तुर्भेमधील 16, बेलापूर मधील 33, कोपरखैरणेमधील 41, नेरुळमधील 51, वाशीतील 25, घणसोलीमधील 54, ऐरोली 82, दिघ्यातील 19 असे एकूण 321 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 126 स्त्रिया व 195 पुरुषांचा समावेश आहे.

शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा 5 हजार 393 इतका झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 3 हजार 86 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. तर आज, बेलापूरमधील 6, नेरुळमधील 18, वाशी 9, तुर्भेमधील 21, कोपरखैरणेमधील 13, घणसोलीमधील 3, ऐरोलीमधील 14, दिघा 1 अशा एकूण 85 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. यामध्ये 28 स्त्रिया आणि 57 पुरुषांचा समावेश आहे. तर, शहरात 2 हजार 127 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 180 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज आणखी 3 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details