ठाणे- बदलापूर शहरात ७, तर अंबरनाथमध्ये १७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बदलापुरातील बाधितांचा आकडा २१३, तर अंबरनाथ शहरातील रुग्णांचा आकडा १३१ वर गेला आहे.
#Corona: बदलापुरात ७, तर अंबरनाथमध्ये १७ जणांचे अहवाल 'पॉझिटिव्ह' - corona in ambarnath
बदलापूर शहरात ७, तर अंबरनाथमध्ये १७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे बदलापुरातील बाधितांचा आकडा २१३ तर अंबरनाथ शहरातील रुग्णांचा आकडा १३१ वर गेला आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेस आज एकूण ३० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह, ११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरातील एकूण बाधित रुग्णांपैकी १०५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर १०१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेस आज एकूण २९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, तर १० निगेटिव्ह आले आहेत. आज १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अंबरनाथ शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३१ झाली आहे. त्यापैकी ४७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ८१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झालाय.