ठाणे : जिल्ह्यातील बदलापूर शहरात आज (रविवार) १२ तर अंबरनाथमध्ये ३५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२५ तर अंबरनाथमध्ये ही संख्या १६६ इतकी झाली आहे. सद्यस्थितीत बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरात प्रत्येकी ११३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील १०५ तर अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील ५० रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.
CORONA : बदलापुरात १२ तर अंबरनाथमध्ये ३५ कोरोनाबाधित रुग्णांची भर
जिल्ह्याच्या बदलापूर शहरात आज १२ तर अंबरनाथमध्ये ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये अंबरनाथ शहरातील ३५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३० रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. तर, बदलापुरात १२ पैकी ६ रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आणि २ रुग्ण कुळगाव बदलापूर नगरपालिका कर्मचारी आहेत.
जिल्ह्यातील बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही चिंतेचा विषय ठरत आहे. आज अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये अंबरनाथ शहरातील ३५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३० रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. तर, बदलापुरात १२ पैकी ६ रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आणि २ रुग्ण कुळगाव बदलापूर नगरपालिका कर्मचारी आहेत. दरम्यान, बदलापूर आणि अंबरनाथ शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ही संख्या निश्चितच चिंता करावयास भाग पाडणारी आहे.