महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडी रेल्वे स्टेशनवर नवीन पार्सल व गुड्स शेड सुरू - latest railway news

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर नवीन पार्सल व वस्तूंचे शेड सुरू केले आहे. या भागात अनेक गोदामे तसेच जवळच एमआयडीसी क्षेत्र आहे.

bhiwandi
भिवंडी रोड रेल्वे स्टेशन

By

Published : Aug 20, 2020, 9:07 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून रेल्वे वाहतुकीला चालना देण्यासाठी वस्तू व पार्सलसाठी भिवंडीत शेड सुरू करण्यात आली आहे. मल्टीडिस्प्लेनरी बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटच्या (बीडीयू) पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

कार्गो पार्सल गाड्या व मालगाड्या हाताळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर नवीन पार्सल व वस्तूंचे शेड सुरू केले आहे. या भागात अनेक गोदामे तसेच जवळच एमआयडीसी क्षेत्र आहे. त्यामुळे गुड्स व पार्सलसाठी भिवंडी शेड उघडल्यानंतर रेल्वेच्या वाहतुकीला चालना मिळेल, अशी अपेक्षा मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.


मुंबई विभागातील कल्याण आणि तळोजे पांचनंद आगार हे पार्सल कार्गो एक्सप्रेस गाड्यांच्या हाताळणीसाठी आधीच खुले करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते शालीमार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष ट्रेन 31 डिसेंबरपर्यंत पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेन चालवत आहे. लॉकडाऊनपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 345 पार्सल गाड्या चालविल्या आहेत. तर 9 हजार 436 टन पार्सल आणि इतर वस्तूंची वाहतूक केली. यामुळे आतापर्यंत 4.23 कोटी रुपयांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे.

मध्य रेल्वेवर विभागीय स्तरावर मल्टीडिस्प्लेनरी बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू) ची स्थापना केली आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेला हा युनिट रेल्वेत अधिक वाहतूक निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधतो.

ABOUT THE AUTHOR

...view details