ठाणे :मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून मृत्यूची संख्यादेखील वाढत आहे. आज(सोमवार) मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. या ८ रुग्णांवर कोविड १९ रुग्णालयात उपचार सुरू होते. काल ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आणि आज त्यात ८ रुगांची भर पडल्यामुळे मीरा भाईंदरच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मीरा भाईंदरमध्ये आज कोरोनाच्या १७८ नव्या रुग्णांची भर तर, ८ जणांचा मृत्यू - mira bhayandar corona updates
मीरा भाईंदर शहरात आजरोजी १७८ नवे रुग्ण आढळून आले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आज १६५ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मीरा भाईंदर कोरोना बधितांची एकूण संख्या ५ हजार ७४६ झाली आहे. आतापर्यंत ४ हजार २७८ जण कोरोनामुक्त झाले असून आज ८ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत एकूण मृत्यूसंख्या ही १९९ झाली आहे.
मीरा भाईंदर शहरात आजरोजी १७८ नवे रुग्ण आढळून आले आहे. या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. यामध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुगणांची संख्या जास्त आहे. तर, तीव्र लक्षणे असलेल्यांची संख्या कमी आहे. मीरा भाईंदर कोरोना बधितांची एकूण संख्या ५ हजार ७४६ झाली आहे. तर आज ८ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत एकूण मृत्यूसंख्या ही १९९ झाली आहे.
आज १६५ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४ हजार २७८ जण कोरोनामुक्त झाले असून १ हजार ६३ जणांचा कोरोना अहवाल प्रतीक्षेत आहे. सध्या १ हजार २६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज मिरारोड परिसरात ६५ तर भाईंदर पूर्व भागात ७५ आणि भाईंदर पश्चिम मध्ये ३८ रुग्ण असे एकूण १७८ रुग्ण सकारात्मक आढळून आले आहे, अशी माहिती मीरा भाईंदर जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.