महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडी शहरात 3 तर ग्रामीण भागात नव्याने आढळले 9 कोरोनाबाधित रुग्ण

भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच गुरुवारी शहरात 3 तर ग्रामीण भागात 9 असे 12 नवे रुग्ण आढळले आहेत. या बारा नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 185 वर पोहचला आहे.

bhiwandi corona update
भिवंडी शहरात ३ तर ग्रामीण भागात नव्याने ९ कोरोनाबाधित रुग्ण

By

Published : May 28, 2020, 8:18 PM IST

ठाणे - भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच गुरुवारी शहरात 3 तर ग्रामीण भागात 9 असे 12 नवे रुग्ण आढळले आहेत. या बारा नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 185 वर पोहचला आहे. भिवंडी शहरात 3 नवे कोरॉना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यामध्ये दिवानशाह दर्गा परिसरात राहणारे 37 वर्षीय एका डॉक्टरचा देखील समावेश आहे.

कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथून आले होते. दुसरा रुग्ण 47 वर्षीय कोंबड पाडा येथील महिला पुणे येथून आली आहे. तर तिसरा रुग्ण टेमघर पाईप लाईन परिसरातील 45 वर्षीय महिला वसई येथून आली होती. शहरातील या तीन नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा 105 वर पोहचला असून, आतापर्यंत 43 रुग्ण बरे झाले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला असून 58 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागातील कोनगाव येथे 29 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच खारबाव येथे 8 नवे रुग्ण आढळले आहेत. या आठ रुग्णांमध्ये एका 10 वर्षीय मुलासह चार पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. या नऊ नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्णांचा आकडा 80 वर पोहचला असून, त्यापैकी 46 रुग्ण बरे झाले असून, तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 31 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 185 वर पोहचला असून, त्यापैकी 89 रुग्ण बरे झाले आहेत. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details