कल्याण डोंबिवली (ठाणे) - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्येने १६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी ४२७ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ३३४ झाली आहे. यामध्ये ६ हजार ३२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत तर आतापर्यंत १० हजार ४७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कल्याण डोंबिवलीत २४ तासात ४२७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ९ रुग्णांचा मृत्यू
महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ३३४ झाली आहे. यामध्ये ६ हजार ३२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत तर आतापर्यंत १० हजार ४७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोमवारी आढळलेल्या ४२७ रूग्णांपैकी कल्याण पूर्व - ९१, कल्याण प. -११६, डोंबिवली पूर्व - १२२, डोंबिवली प- ६२, मांडा टिटवाळा- २०, मोहना – १२ तर पिसवली येथील ४ रुग्णांचा समावेश आहे
दरम्यान, महापालिका हद्दीत लॉकडाऊनसह धारावीच्या धर्तीवर गेल्या आठवड्याभरापासून आरोग्य विभागासह विविध सामाजिक संघटना घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करीत आहेत. तसेच महापालिका हद्दीतील १० ते १२ नगरसेवक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० वर गेलेला रुग्णांचा आकडा गेल्या दोन दिवसात ४०० ते ४५० वर आला आहे.