ठाणे - भिवंडीत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसात शहरात तब्बल 36 नवे रुग्ण आढळले आहे. ग्रामीण भागात देखील या दोन दिवसात 11 नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण व शहरात दोन दिवसात तब्बल 47 नवे रुग्ण आढळले आहेत. या 47 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 300 वर पोहचला आहे.
भिवंडीत कोरोनाचा कहर; ४७ नव्या रुग्णांसह आकडा ३००वर - भिवंडी कोरोना पेशंट
भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा आता 300 वर पोहचला आहे. त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 160 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
भिवंडी शहरात सोमवारी 18 तसेच मंगळवारी देखील 18 नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत शहरात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन दिवसातील या 36 नव्या रुग्णांमुळे शहरातील बाधित रुग्णांचा आकडा 183 वर पोहचला आहे. तर 68 रुग्ण बरे झाले असून 104 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ग्रामीण भागात देखील सोमवारी एक तर मंगळवारी 10 असे दोन दिवसात 11 नवे रुग्ण आढळले आहेत.
या 11 नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 117 वर पोहचला आहे. त्यापैकी 58 रुग्ण बरे झाले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 56 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा आता 300 वर पोहचला आहे. त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 160 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.