ठाणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लावला गेला. या लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय बंद पडले. मात्र, निसर्गासाठी हा लॉकडाऊन वरदान ठरला आहे. लॉकडाऊनमुळे प्रदुषण कमी झाले. सोबतच अनेक नवनवे प्राणी जंगलात दिसायला लागले आहे. येहूरच्या जंगलातदेखील १२० नवीन प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.
येहूरच्या जंगलात माणसांचा वावर घटला, पक्ष्यांना निवारा मिळाला
लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे बंद झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, या काळात प्रदुषण फार कमी झाले असून निसर्गाने मोकळा श्वास घेतला आहे. नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छ झाले आहे. सोबतच अनेक दुर्मिळ प्राणी-पक्षी दिसायला लागले आहेत.
लॉकडाऊनमुळे या जंगलात वाहनांची आणि लोकांची रेलचेल बंद होती. त्यामुळे या भागात प्राणी आणि पक्षांचा वावर वाढला आहे. या जंगलात १२० नवीन प्राणी आढळले आहे. यामधील काही प्राणी आणि पक्षी स्थलांतरीत आहेत. येथे फ्लेमिंगो, बुलबुल, सनबर्ड, एशियन ओपन बिल, मलबार व्हिसलिंग तृष, टिकल ब्लू, ग्रे बर्ड पक्षी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.