नवी मुंबई - येथे दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे एकीकडे वाटत असतानाच रविवारी नवी मुंबईत आणखी 85 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे रविवारी 52 रुग्ण बरे होऊन घरीदेखील परतले आहेत.
नवी मुंबईत रविवारी आढळले 85 नवे कोरोनाबाधित, तर 52 कोरोनामुक्त - navi mumbai corona news update
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रविवारी करोनाचे ८५ रुग्ण आढळून आले आहेत. तर, ५२ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून मुंबई-पुणे ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. यातच, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरानेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत 1 हजार 657 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 11 रुग्ण हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. तर, आत्तापर्यंत नवी मुंबईत 10 हजार 149 लोकांची कोव्हीड -19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 7 हजार 577 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 926 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 646 इतकी आहे, त्यात रविवारी 85 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून 52 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, आत्तापर्यंत 820 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत 52 व्यक्तींचा कोरोनामुळे बळी गेला आहे.