महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत 65 कोरोनाचे नवे रुग्ण तर 72 जण कोरोनामुक्त परतले घरी - new covid 19 patient

सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 487 इतकी आहे. आज 65 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 72 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

navi mumbai
नवी मुंबईत 65 कोरोनाचे नवे रुग्ण तर 72 जण कोरोनामुक्त परतले घरी

By

Published : May 22, 2020, 11:19 PM IST

नवी मुंबई -कोरोनाचा कहर कमी होत आहे, असे वाटत असतानाच आज नवी मुंबईत 65 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे आजच 72 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली. शहरात आत्तापर्यंत 1 हजार 498 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 9 हजार 637 लोकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 7 हजार 267 जण निगेटिव्ह आले असून, 883 जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 487 इतकी आहे. आज 65 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 72 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत 620 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, घरी परतले आहेत. आज दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत 49 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details