ठाणे - कल्याण-डोंबिवलीत कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊनपासून विविध ठिकाणी ग्राहकांची उडणारी झुंबड लक्षात घेता २७ मार्चला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ मार्केट (रिटेल) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अनलॉक काळात घाऊक (होलसेल) बाजारात पुन्हा तोबा गर्दीचे चित्र पाहावयास मिळले आहे. याच तोबा गर्दीमुळे गेल्या २० दिवसापासून पुन्हा कोरोना फैलाव झपाट्याने होत असल्याचे दिसून आले आहे. आज रविवारी 549 रुग्ण आढळून आल्याने आतापर्यत रुग्णांच्या संख्येने 35 हजाराचा आकडा पार केला. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील तोबा गर्दी कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे.
कल्याण बाजार समितीतील गर्दीने वाढला 'कोरोना'! आजही आढळले 549 रुग्ण - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाबाधित बातमी
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून २७ मार्चला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ मार्केट (रिटेल) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु येथील गर्दी काही कमी होताना दिसत नाही. तसेच आजर रविवारी येथील रुग्णसंख्या वाढलेली दिसून आली.
आजही (रविवारी) कल्याण-डोंबिवलीत मागील 24 तासांत 549 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आतापर्यत कोरोनाग्रस्तांची संख्या 35 हजार 235 जाऊन पोहोचली आहे. तर आजही 5 हजार 269 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून आज 405 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 29 हजार 238 रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले. तर गेल्या 24 तासांत 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू असून आतापर्यंत 728 रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांची विगवारी पाहता, कल्याण (पू) : 80, कल्याण (प) : 200, डोंबिवली (पू) : 154 ,डोंबिवली (प) : 88, मांडा-टिटवाळा :14 , मोहना - 13 असे एकूण दिवसभरात 549रुग्ण आढळून आले आहे.
लॉकडाऊन काळात संपूर्ण व्यवहार बंद असले तरी जीवनावश्यक वस्तूंची अडचण भासू नये म्हणून कल्याण कृषी बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय त्यावेळी पालिका प्रशासन व बाजार समितीच्या पदाआधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र, आता अनलॉक काळात गेल्या दीड महिन्यापासून धान्य, भाजीपाला खरेदीसाठी कल्याण बाजार समितीमध्ये ग्राहकांची झुंबड उडत असून शेकडो ग्राहकांच्या तोंडाला तर मास्कही दिसून येत नाही. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिकच वाढला आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घालून भाजी खरेदीसाठी होणाऱ्या तोबा गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची आवश्यकता असल्याची मागणी पुढे आली आहे.