महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण डोंबिवलीत 209 नवे कोरोनाबाधित; आतापर्यंत 412 रुग्णांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मागील 24 तासांत 209 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. एकूण बाधितांचा आकडा 21 हजार 607 वर पोहोचला आहे.

KDMC
KDMC

By

Published : Aug 6, 2020, 7:08 PM IST

कल्याण डोंबिवली (ठाणे) - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या 24 तासांत 209 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आजपर्यंत (दि. 6 ऑगस्ट) 412 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 445 कोरोनाबाधित रुग्णांना विविध रुग्णालयातून गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळून आलेल्या 209 कोरोनाबाधित रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 21 हजार 607 वर घरात पोहोचली आहे. यापैकी 16 हजार 452 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 412 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरीत 4 हजार 743 सक्रिय (अ‌ॅक्टीव्ह) रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी (6 ऑगस्ट) आढळून आलेल्या 209 रुग्णांमध्ये कल्याण पूर्व - 38, कल्याण पश्चिम - 57, डोंबिवली पूर्व - 57, डोंबिवली पश्चिम - 48, मांडा टिटवाळा - 7, तर मोहना येथील 9 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, दिवसभरात डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपैकी 445 रुग्ण हे कल्याण-भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रामधील कोविड केअर सेंटरमधून 144, तर 7 रुग्ण डोंबिवलीतील वै. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, तसेच बाज आर.आर. रुग्णालयातून 7 रुग्ण, 1 रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून, तर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून 4 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details