ठाणे- शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शहरात सोमवारी १५४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रोज रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर रुग्ण आढळलेले परिसर बंद करण्यात येत असून लोकांना बाहेर फिरण्यास पोलिसांमार्फत मज्जाव करण्यात येत आहे.
ठाण्यात कोरोनाचा कहर, सोमवारी आढळले नवे 154 रुग्ण - Corona patients thane
ठाण्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे. सध्या ठाण्यात कोरोना बाधितांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1,267 एवढी आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 838 एवढी आहे. तर, मृतांचा आकडा 67 वर आहे. सोमवारी 154 नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची ठाण्यातील एकूण संख्या 2 हजार 172 वर पोहोचली आहे.
ठाण्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे. सध्या ठाण्यात कोरोना बाधितांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1,267 एवढी आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 838 एवढी आहे. तर, मृतांचा आकडा 67 वर आहे. सोमवारी 154 नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची ठाण्यातील एकूण संख्या 2 हजार 172 वर पोचली आहे.
ठाण्याच्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत सोमवारी 8 नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांचा आकडा 119 वर गेला आहे. वर्तकनगर प्रभाग समितीत 11 नव्या रुग्णांची भर पडून रुग्णांचा आकडा शंभरी पार 108 वर पोहोचला आहे. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीत सोमवारी तब्बल सर्वाधिक 48 रुग्ण सापडले. यामुळे रुग्णांचा एकूण आकडा 626 वर पोहचला आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत सोमवारी 20 नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांचा आकडा 234 वर पोहचला आहे. उथळसर प्रभाग समितीत सोमवारी 11 नव्या रुग्णांची भर पडून रुग्णांचा आकडा 181 वर गेला आहे.
वागळे प्रभाग समितीत सोमवारी 21 नव्या रुग्णांची भर पडलेली असून रुग्णांचा आकडा हा 335 वर गेला आहे. कळवा प्रभाग समितीत 13 नव्या रुग्णांची भर पडून रुग्णसंख्या 189 एवढी झालेली आहे. मुंब्रा प्रभाग समितीत 19 नव्या रुग्णांचा संख्येने एकूण रुग्णांची संख्या 288 वर पोहचली आहे. तर दिवा प्रभाग समितीत मात्र 3 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. प्रभाग समितीच्या एकूण रुग्ण आकडा 88 वार पोहचला आहे. ठाण्यात लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीत अव्वल असून एकमेव प्रभाग समिती आहे त्यात रुग्णांचा आकडा सहाशे पार आहे.