महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 17, 2020, 9:05 AM IST

Updated : May 17, 2020, 11:13 AM IST

ETV Bharat / state

पनवेल महापालिका क्षेत्रात 12 कोरोनाबाधित रुग्णांची नोंंद, तर 12 जण बरे होऊन घरी परतले

पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 12 जण बरे झाले असून त्यांना शनिवारी डिस्चार्ज मिळाला आहे. यामध्ये कामोठ्यातील 4, खारघरमधील 2, कळंबोलीतील 2, पनवेलमधील 2 तसेच तळोजा आणि नवीन पनवेलमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 246 कोरोनाबाधित
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 246 कोरोनाबाधित

नवी मुंबई - पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिका क्षेत्रात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील 7, खारघरमधील 2, कळंबोलीतील 2 व तळोजा आरएएफ कॅम्पमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच, महापालिका क्षेत्रात 12 कोरोनाबाधित रुग्ण पुर्णपणे बरे झाले असून ते शनिवारी घरी परतले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत नोंद झालेल्या एकूण 246 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 112 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 7 जणांचा बळी गेला असून सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 127 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रात 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंंद

कामोठ्यात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले असून कामोठे, सेक्टर-10 येथील 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती जेएनपीटी, उरण येथे कार्यरत आहे. तसेच कामोठे, सेक्टर-1 मधील 28 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. वांद्रे येथील निर्मल नगर पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय कामोठे, सेक्टर-11 मधील 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती मुंबईतील ऑर्थररोड जेलमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून त्यालाही कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला आहे. तसेच कामोठ, सेक्टर- 18 मधील हरिओम कॉम्लेक्स येथील 39 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीला टायफाईडचा त्रास असून तो उपचारासाठी रुग्णालयात जात होता. त्या रुग्णालयामध्येच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याशिवाय कामोठे, सेक्टर- 5 मधील 42 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेचा पती मुंबई महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्याच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाला आहे. कामोठे, सेक्टर-16 मधील 27 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ही महिला नेरुळ येथील एका डायग्नोसिस सेंटरमध्ये तपासणीसाठी वारंवार जात होती. तेथेच तिला संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय कामोठे, सेक्टर-6 मधील, 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. ही व्यक्ती दादर बेस्टडेपो येथे बेस्ट ड्रायव्हर म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच त्याला संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

खारघरमध्येही दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून खारघर सेक्टर-36 स्वप्नपूर्ती सोसायटीतील 48 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती मुंबईतील ऑर्थररोड जेलमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच त्याला संसर्ग झाला आहे. यासह खारघर, सेक्टर-15 घरकुल मातृछाया सोसायटीतील 41 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती चेंबूरच्या जीओ कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच त्याला संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कळंबोलीत कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळले असून कळंबोली सेक्टर-2 मधील 44 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती गोवंडीतील शिवाजी नगर बेस्ट डेपोमध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच त्याला संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. तर, दुसरी व्यक्ती ही कळंबोली, सेक्टर-3ई, मध्ये राहत असून या 27 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. रसायनीतील आष्टे लॉजेस्टीक कंपनीत कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तळोजा आरएएफ कॅम्पमधील 34 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून अपेंडिक्सचा त्रास असल्याने ही व्यक्ती उपचारासाठी वारंवार रुग्णालयात जात होती. त्यावेळीच त्यास संसर्ग झाला आहे. तर, शनिवारी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 12 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Last Updated : May 17, 2020, 11:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details