ठाणे : शहरातील शेजारी राहणाऱ्या ४५ वर्षीय आरोपीने पत्नीची छेड काढली म्हणून नवऱ्याने शेजारीशी भांडण करून वाद घातला होता. याच भांडणाच्या वादातून भांडण करणाऱ्या दांपत्याचे १२ वर्षाच्या मुलाच्या तोंडावर स्प्रे मारून त्याचे अपहरण ( Child Abduction in Thane ) केले. धक्कादायक बाब म्हणजे स्प्रे तोंडावर मारल्याने मुलगा बेशुद्ध झाल्याचे पाहताच त्या मुलीला निर्जनस्थळी असलेल्या डोंगराळ खदानीच्या खड्यात फेकून पळ काढला होता. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोला बनारसी चव्हाण (वय 45) असे गुन्हा दाखल झालेल्या संशितिय शेजाऱ्याचे नाव असून सत्यम असे अपहरण केलेल्या मुलाचे नाव आहे.
Thane Crime : बायकोची छेड काढली म्हणून नवऱ्याचे शेजाऱ्याशी भांडण; शेजाऱ्याने १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून फेकले खदानीत - Neighbor kidnapped 12 year old boy in Thane
ठाण्यात शेजाऱ्याशी झालेल्या वादातून आरोपीने 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करत ( Child Abduction in Thane ), आरोपीने मुलाला खदानीत फेकले. कुटुंबाने मुलाचा शोध घेतला असता, तो मुलगा घराजवळ असलेल्या डोंगराळ खदानीच्या कापरी लगत एका दगडावर बेशुद्ध पडलेला आढळला. त्यानंतर तातडीने त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण -प्राप्त माहितीनुसार रोहीत लालबहादुर सिंह ( वय 33 ) हे पत्नी व दोन मुलांसह टिटवाळा नजीकच्या बल्याणी गावातील एका चाळीत राहतात. तर आरोपी भोला चव्हाण त्यांच्या शेजारी राहत असून तो रिक्षाचालक आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वी रोहीतच्या पत्नीची भोलाने छेड काढली होती. यावरून नवरा रोहितने आरोपी भोलाशी जोरदार भांडण करून वाद घातला होता. या भांडणानंतर आरोपी सतत रोहितच्या कुटूंबाला बदला घेण्याची धमकी देऊन, तुमच्या कुटुंबातील सदस्याचे अपहरण करेल, असा बोलत होता. मात्र रोहितने त्याच्या धमकीकडे लक्ष दिले नाही. त्यातच १२ वर्षांचा मुलगा सत्यम बुधवारी घरातून कचरा टाकण्यासाठी गेला असता, बराच वेळ होऊन देखील तो न आल्याने कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. त्यांच्या मदतीला बजरंग दलच्या सदस्य धावले आणि सत्यम शोधण्यास सुरवात केली असता, घराजवळ असलेल्या डोंगराळ खदानीच्या कापरी लगत एका दगडावर बेशुद्ध पडलेला आढळला. त्यानंतर तातडीने त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आरोपीचा शोध सुरू - त्यानंतर बजरंग दल कार्यकर्त्याने कल्याण तालुका पोलिस ठाण्यात पोहोचले आणि सत्यमच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार पोलिस उपनिरीक्षक दिलीप देशमुख यांनी सत्यमच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सत्यमच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रुग्णालयात उपचार केल्यानंतर सत्यम शुद्धीवर आला. त्याने सांगितले की, कचरा टाकण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्याच्या मागे कुणीतरी स्प्रे फवारणी केली आणि जेव्हा तो वळला, तेव्हा काळा शर्ट पॅट घातलेला व्यक्तीने पुन्हा त्याच्यावर तोंडावर स्प्रे फवारणी केली. त्यामुळे बेशुद्ध झाल्याने मी त्या व्यक्तीचा चेहरा पाहू शकला नाही. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.