महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे : चक्रीवादळात पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावण्याच्या मागणीसाठी महापालिकेत आंदोलन - ठाणे लेटेस्ट न्यूज

चक्रीवादळाचा फटका ठाण्याला देखील बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मात्र दोन दिवस होऊन देखील अद्यापही या झाडांची विल्हेवाट लावण्यात न आल्याने, महापालिका विरोधीपक्ष नेते शानु पठाण यांनी आंदोलन केले आहे. त्यांनी हातात झाडांच्या फांद्या घेऊन पालिकेच्या मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेत राष्ट्रवादीचे आंदोलन
महापालिकेत राष्ट्रवादीचे आंदोलन

By

Published : May 19, 2021, 6:57 PM IST

ठाणे -तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईसोबतच ठाण्याला देखील बसला आहे. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत, तर अनेक जणांच्या घरांचे आणि वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. मात्र दोन दिवस उलटूनही पडलेली झाडं रस्त्यांवर जशीच्या तशीच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्या नागरिकांच्या घरांवर झाडं पडली आहेत, त्यांनी याबाबत महापालिका प्रशासनाला सांगून देखील या झाडांची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाणेकरांमधून संताप व्यक्त होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महापालिकेचे विरोधीपक्ष नेते शानु पठाण यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. त्यांनी यावेळी हातात झाडाच्या फांद्या घेऊन, पालिकेच्या मुख्यालयात घूसण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेत राष्ट्रवादीचे आंदोलन

शानु पठाण यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महापालिकेत आज आयोजित करण्यात आलेल्या महासभेत या विषयाची लक्षवेधी मांडण्यासाठी आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, शानु पठाण हे पडलेल्या झाडांच्या फांद्या घेऊन पालिका मुख्यालयात पोहोचले होते. मात्र पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखलं, त्यामुळे सुरक्षारक्षक आणि शानु पठाण यांच्यात वाद झाला. याची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, शानु पठाण यांना काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. मात्र हे आंदोलन इथेच थांबणार नाही, जोपर्यंत पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावण्यात येणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहाणार असल्याचे यावेळी शानु पठाण यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details